Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
माणुसकीला काळिमा फासणारा निर्णय, मालेगावच्या कोरोना रुग्णावर नाशकात उपचार नको ; नाशिक भाजपा नेत्यांची मागणी…

दि . 08/05/2020

मालेगाव संदर्भातला दुजाभाव पुन्हा एकदा उघड, सर्वत्र संताप, तिव्रनिषेध.

जागतिक महामारीच्या संकटसमयी , नाशिक भाजपई नेत्यांनी मालेगावच्या कोरोना बाधित रुग्णांवर नाशकात उपचारास विरोध केला असून , जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातुन तशी मागणी केली आहे. माणुसकीला काळिमा फासणारा हा पराक्रम करून असवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. नाशिककर नेत्यानाकडून, मालेगाव संदर्भातला दुजाभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. या बिनडोक निर्णयाविरोधात मालेगावी जोरदार संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, सर्वचस्तरातून तीव्रनिषेध करण्यात येत आहे. मालेगाव सध्या कोरोनाचे देशात तिसरं हॉटस्पॉट बनलं आहे. यात शंका नाही, अश्या या बिकट समयी येथील आरोग्य यंत्रणा दिवस रात्र, जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत, अतिरिक्त मदत म्हणून नाशिकचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्याला आता विरोध होऊ लागल्यानं मालेगाव नाशिक जिल्ह्याचच अंग आहे की नाही ,असा सवाल आता केला जात आहे. बर विरोध करणाऱ्यांमध्ये सीमा ताई ह्या मालेगावच्या माहेरवाशीण असूनही त्यांनी विरोध करून सासरलाच लाथाळल्याने याहून आणखी दुर्दैव काय, दुर्दैव मालेगावच्या वाट्याला अनेक मंत्रिपद येऊनही, नाशिकच्या नेत्यांपेक्षा एकही वजनदार नेता येथून निर्माण झालं नाही. लोकसंख्येचा निकषानुसार तीसवर्षांपूर्वीच मालेगाव जिल्हा व्हायला हवा होता, मात्र झारीतले शुक्राचार्यांनी छुपा विरोध करून या शहराला वंचित ठेवलं आहे. आणि आता रुग्ण नाकारून मालेगावाचा तिरस्कार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आल्याची भावना शहरात उमटत आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून मेहमी भाजपाचे खासदार मालेगावकराणी निवडून दिला आहे. तेच खासदार आता नाशिकच्या आपल्याच नेत्यांच्या भूमिकेवर मूग गिळून बसले आहे. आता मालेवातील भाजपाच्या नेत्यापासून तळागाळातील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि नाशिक भाजपाई नेत्यांच्या निर्णयायला कडाडून विरोध करावा, ज्याचं आवाज दिल्लीच्या कानी पडावा अशी अपेक्षा नव्हे तर मागणी होत आहे. याचा विरोध म्हणून आम्ही मालेगावकर सह शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित सोशल अंतर ठेवत अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निषेध नोंदवला असून हाताला काळी पट्टी बांधून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

भगवान पाटील- जेष्ठ पत्रकार


ताज्या बातम्या