Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाने चौघांचा मृत्यू बळींची संख्या १८; काल दिवसभरात ७ नवे रुग्ण

दि . 08/05/2020

शहरात गुरुवारी (दि.७) एकाच दिवसात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. शहरात आतापर्यन्त १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेेत. शहरात कोरोना बाधितांचा आकडा ४२० वर पोहचला आहे.
मालेगाव शहरात सात नवे रुग्ण मिळून आले. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा सव्वाचारशेच्या घरात पोचहला आहे. शहरात रुग्णवाढीचा आलेख थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी दिवसभरात मालेगाव शहरात कोरोनाशी लढा देणाऱ्या चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती, निवासी वैद्यकीय अधिकारी नाशिक यांनी दिली. मालेगाव शहरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कसमादेनां परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.


ताज्या बातम्या