Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
चंदनपुरीत कोरोनाचा शिरकाव; पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना -warriorला सलाम..

दि . 07/05/2020

मालेगाव तालुक्यातील कोरोनाची वाटचाल ग्रामीण भागाकडे सुरूच , दाभाडी नंतर आता चंदनपुरीत देखील कोरोनाने धडक दिली आहे.
मालेगाव शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून प्रशासन सर्वोतोपरी यावर लढा देण्यासाठी काम करीत असतांनाच आता त्याने ग्रामीण भागाकडे देखील आपली पकड बनवायला सुरू केली आहे.पण ग्रामीण भागत जास्त सतर्कतेचा परिणाम सवदंगाव येथील बाधित रुग्णासह ६ जन निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.मालेगाव तालुक्यातील दाभाडीत ७ पेक्षा जास्त रुग्ण आढळुन आल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.या सर्वांना दाभाडी येथे ठेवण्यात आले आहे तर सर्वांची प्रकृती स्थिर असून बऱ्याच अंशी सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.
चंदनपुरीचा तरुण हा एक शासकीय नोकरीला असून स्वतःच्या जिवावर खेळून पॉझिटिव्ह रुग्णाची तो सेवा करीत होता.त्यांच्या मनात थोडी शंका आल्याने त्याने स्वतःच कोरोनाची टेस्ट करून घेतली आणि आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.अश्या ठिकाणी काम करून स्वतःच्या जीवाची चिंता न करता पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या या दिलदार तरुणाला कसमादे अपडेटचा सलाम..

लवकरच बरा होऊन घरी येण्यासाठी शुभेच्छा...


ताज्या बातम्या