Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
एक विवाह ऐसा भी

दि . 07/05/2020

 मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वऱ्हाडीची उपस्थिती तिथे आलीच..नवरीच्या कलवऱ्यांचं नटनं.. वरमायांचा मानपान..तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी..पण हे सगळं आता थांबलय..त्याला कारणही तसेच आहे..सध्या सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि लॉक डाऊनचा वरचष्मा..पण या सगळ्यातही त्यांनी आपला लग्न सोहळा घरातच उरकला आहे..अर्थात सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच मालेगावातील प्रसिद्ध व्यापारी नेमिचंद चोपडा यांचे चिरंजीव शुभम व निलेश टाटीया यांची कन्या हिमानी यांचा विवाह अगदी साध्या पध्दतीने अवघ्या सात लोकांच्या उपस्थितीत घरातच पार पडला.
सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धूमाकूळ घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण समारंभांवर देखील बंधन आली आहेत. याचा परिणाम लग्न समारंभ देखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले. परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत चोपडा व टाटीया परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला. या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना न आमंत्रण देता वधू व वराच्या आई वडीलांनीच पार पाडला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून कॅम्प परिसरात एकच चर्चा आहे, "एक विवाह ऐसा भी।" या विवाहामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे
----------

 विवाहाची तारीख पूर्वी ठरलेली होती. संचारबंदी असल्याने विवाह पुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला. शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेला फाटा देऊन घरातच विवाहाचा निर्णय घेतला.
- नेमीचंद चोपडा, व्यापारी, मालेगाव

--------


ताज्या बातम्या