Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सवंदगावकरांसाठी आनंददायक बातमी....

दि . 07/05/2020

पॉझिटीव्ह तरुणाच्या दुसऱ्या अहवालासह संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह

मालेगाव : तालुक्यातील सवंदगाव येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संबंध गावात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या तरुणाचा दुसरा चाचणी अहवाल व त्याच्या संपर्कातील ७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सवंदगावकरांच्या जीवात जीव आला आहे.

गेल्या २४ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील सवंदगाव येथील तरुणाची तब्येत खराब झाल्याने त्यास मंसुरा रुग्णालयात दाखल केले होते. त्यात करोना सदृश्य लक्षण दिसून आल्याने त्याचे घश्याचे श्राव तपासणीसाठी पाठविले होते.  दि.२७ रोजी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे होम क्वारंटाइन असलेल्या या तरुणाला याची माहिती देण्यात तब्बल दहा दिवसानंतर मिळाली, तोपर्यंत बराच उशीर झाल्यामुळे या तरुणाचा गावातील अनेकांशी संपर्क आला. यानंतर या तरुणासह त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले. यावेळी या तरुणाच्या दुसऱ्या चाचणीसह त्याच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले असता सर्व अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे संपूर्ण सवंदगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र आता तरी सवंदगाव व परिसरातील नागरिकांनी सजग व सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


ताज्या बातम्या