Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक ! भ्रष्टाचाराचे कुरणं, मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाटपाचे साहित्याचे वाटपच नाही; आयुक्तांकडून भांडाफोड..

दि . 06/05/2020

मालेगांवात कोरोना वाढता कहर पाहता कोरोना विरोधात लढणाऱ्यासाठी प्राप्त   साहित्य वाटपच झाले नसल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला असून आयुक्तांनी दोघांनविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

आरोग्यसेवेतील डॉक्टर ,सफाई कर्मचारी  यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट व सुरक्षा साहित्य खरेदी केली होते व काही साहित्य महापालिकेला प्राप्त झाले होते. सदर साहित्य वाटप झाल्याचे सांगण्यात आले. मात्र  हे साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर व कर्मचाऱयांनी केल्याने आयुक्त त्र्यंबक कासार यांनी माहापालिकेच्या अधिकारी व डॉक्टरसह महापालिकेच्या  वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षात जाऊन पाहणी केली असता साडेतीन हजार पीपीई किट ,20 हजार मास्क ,दोन  हजार एम-95 मास्क ,फेसशिल्ड मास्क , सानेटायझर , थर्मल मीटर,औषधी गोळ्या  असे  सामान गोदामात पडून असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचऱ्यावर साहित्य वाटपाची जबाबदारी होती दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.


ताज्या बातम्या