Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! विदेशात अडकलेल्या भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार

दि . 05/05/2020

नवी दिल्ली:- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आता टप्प्याटप्प्याने भारतात आणले जाणार आहे. याबाबतचे पत्रक गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलं आहे. 7 मेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी नौदलाची विमाने आणि युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. या युद्धनौकांद्वारे नागरिकांना परत आणले जाणार आहे. तसेच भारतीय दूतावासांकडून विदेशात अडकलेल्या प्रवाशांची यादी तयार केली जात आहे. सुरुवातीला या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणल्या जाणार आहे. भारतात परतल्यानंतर या नागरिकांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावं लागणार असून 14 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाइन केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 


ताज्या बातम्या