Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गापासून पोलिसांना वाचण्यासाठी शिबीर....

दि . 05/05/2020

कोविड-19 करिता मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बंदोबस्त करण्यासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची संपूर्ण  काळजी घेतली जाते आहे. 

पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह  हया स्वतः मालेगाव येथे कॅम्प करून राहत असून वेळोवेळी बंदोबस्ताचे पॉईंट वरील अधिकारी व कर्मचारी यांना भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबत विचारपूस करत आहे व त्यांना कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गापासून वाचण्यासाठी सर्व साहित्य वाटप करण्यात येत आहे तसेच त्यांच्या राहत्या ठिकाणी भेट देऊन तेथिल परिसराची साफसफाई  बाबतच्या सूचना संबधीत अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली  बालाजी लॉन्स मालेगाव  येथे नियमित आरोग्य शिबीर घेण्यात येत असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी करून पुढील उपचार करण्यात येत आहे मा. पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त पॉइंटचे ठिकाणी जाऊन प्रत्येक पोलिस कर्मचारी यांची आरोग्याबाबत विचारपूस केली व त्यांना आरोगबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.


ताज्या बातम्या