Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक - बेजबाबदार यंत्रणेमुळे संपूर्ण गाव वेठीस , कोरोना बाधित रुग्णाचा मुक्त वावर, १० दिवसानंतर आली जाग..

दि . 04/05/2020

१० दिवसांनी आरोग्य यंत्रणेला आली जाग..

मालेगाव : करोना बाधित रुग्णाचा मुक्त वावर, १० दिवसांनी आरोग्य यंत्रणेला आली जाग.. अवाक झालात ना..! ही घटना आहे मालेगाव तालुक्यातील सवंदगाव येथील, आणि यास जबाबदार आहे ती शहरातील ढिसाळ आरोग्य यंत्रणा.

मालेगाव शहरासह तालुक्यात करोना बाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला शहरातील नागरिकांसह आरोग्य यंत्रणा देखील जबाबदार आहे. गेल्या २४ एप्रिल रोजी तालुक्यातील सवंदगाव येथील तरुणाची तब्येत खराब झाल्याने तो शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला. मात्र त्याची लक्षण बघता तेथील डॉक्टरांनी त्यास मंसूरा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे घश्याचे श्राव तपासणीसाठी पाठविले. मात्र यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला. २७ एप्रिल रोजी सदर तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह याची माहिती सदर तरुणाला देण्यात आली नाही. विशेष म्हणजे या तरुणाचा पत्ता येथील आरोग्य यंत्रणेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १० दिवसानंतर म्हणजे आज आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यास शोधत सवंदगाव येथे आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मात्र गेल्या १० दिवसात सदर तरुणाचा गावातील अनेकांशी संपर्क आल्याने गावातील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. या संपूर्ण घटनेला मालेगाव शहरातील आरोग्य विभागाबरोबरच महापालिका प्रशासन देखील जबाबदार असून यामुळे संपूर्ण गाव वेठीस धरले गेले आहे. शहरात असे बरेच रुग्ण मुक्त वावरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


ताज्या बातम्या