Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळ्यात अवैद्य गावठी दारू अड्ड्यावर छापा ;गुन्हा दाखल

दि . 04/05/2020

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , आज दि 3 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास देवळा येथील इंदिरानगर येथे आरोपी काळु फुलाजी ठाकरे हे अवैद्य रित्या गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला . यावेळी पोलिसांना आरोपी हाती लागला नाही.त्यानी आरोपीच्या घराच्या पाठीमागे आडोशाला असलेली विनापरवाना व बेकायदा दोन प्लॅस्टिकचा कॅंन मध्ये असलेली एकूण 45 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू जवळपास 4 हजार 500 रुपये किमतीची जप्त केली.सदर घटनेतील आरोपी फरार झाला असून ,त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील गांगुर्डे करीत आहेत . 
देवळा:- देवळा येथील इंदिरानगर येथे अवैद्य गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 45 लिटर बेकायदेशीर अवैद्य गावठी दारू हस्तगत केली असून , या गुन्ह्यातील फरारी आरोपी विरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या