Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोलीस ,आरोग्य, मनपा कर्मचाऱ्यांच्या नंतर कोरोनाने WHO कर्मचाऱ्याला देखील घेतले आपल्या जाळ्यात...

दि . 03/05/2020

मालेगावी मागील काही वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)  सर्वेक्षण अधिकारी म्हणून मालेगावात कार्यरत असलेल्या सर्वेक्षण अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डॉक्टर असलेल्या या अधिकाऱ्याला तातडीने विलगीकरण करण्यात आले आहे.
रविवार सकाळी आलेल्या २७ अहवालात ही चिंताजनक बाब समोर आली आहे. मालेगावी होत असलेला कोरोनाचा प्रसार , त्याची कारणे व नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आदींचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सदर सर्वेक्षण अधिकारी शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सर्वे करत होते. अनेक वेळा परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांना कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक क्षेत्रातही जावे लागले होते. कोरोना संक्रमण न होण्याच्या उपाययोजनांचे अनुकरण करूनही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा संक्रमण झाल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना हा विषाणू संक्रमणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याने नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या