Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गिरणा नदीत उडी घेऊन एक विवाहितेची आत्महत्या ; लोहणेर येथील घटना..

दि . 02/05/2020

देवळा प्रतिनिधी :(राकेश आहेर)लोहनेर तालुका देवळा येथे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका महिलेने गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर च आली आहे. स्थानिकांना मजताच परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. यावेळी बघ्यांनांं  सोशल डिस्टन्सच भान    देखिल नसल्याचे समोर आले.
     लोहनेर तालुका देवळा येथील मृत्त विवाहित महिला नाव वैष्णवी सचिन गवळी वय वर्ष अंदाजे २० असून आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसुन देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी मृतदेह बाहेर काढून देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनवणे  करत आहेत.


ताज्या बातम्या