Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आनंद वार्ता...मालेगाव शहरात करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ..

दि . 01/05/2020

आज १३ रुग्ण घरी परतले ; करोनामुक्त रुग्णांची संख्या २०

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरातील १३ करोना बाधित रुग्ण हे आज दि.१ मे रोजी उपचाराअंती करोनामुक्त झाले असून त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून घरी सोडण्यात आले. पाच 
दिवसांपूर्वी शहरातील एकाच वेळी तीन रुग्ण
व त्यानंतर ४ असे एकूण ७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. आज पुन्हा १३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना सोडण्यात आले.

शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज शुक्रवारी एकाच वेळी १३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला. याआधी म्हणजे दि.२६ व २७ रोजी अनुक्रमे ३ व ४ याप्रमाणे ७ रुग्ण करोनामुक्त
झाल्याने त्यांना कृषी मंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, इन्सिडन्ट कमांडट तथा उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी, माजी आमदार रशीद शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देत घरी सोडण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक आदेशाचे व प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.


ताज्या बातम्या