Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
घराबाहेर निघाल्यास २५००० रुपये दंड ; मालेगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय...

दि . 01/05/2020

मालेगाव तालुक्यात सौदांणे ग्रामपंचायतीचा आदेश

मालेगाव :- करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. देशात देखील बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरात करोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे सावट पसरले आहे. या अनुषंगाने तालुक्यातील सौदांणे येथील ग्रामपंचायतीने दि.१ ते ३ मे या कालावधीत संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत गावातील दवाखाने व मेडिकल व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायतीने दिले आहेत.

मालेगाव शहर व परिसरामध्ये करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शहरात २७६ रुग्ण संख्या झाली असून या वाढत्या रुग्ण संख्येचा धसका मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागा ने देखील घेतला आहे. तालुक्यातील सौदांणे येथील सरपंच डॉ.मिलिंद पवार यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून गावातील 
सर्व व्यवहार ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देऊन ग्रामपंचायत प्रशासनास याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. या कालावधीत गावातील दवाखाने व मेडिकल व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या काळात गावकऱ्यांना बाहेर जाण्यास व बाहेरून कोणाला येणास मनाई करण्यात आली आहे. मळ्यात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनी देखील गावात येऊ नये व बाहेर गावाहून देखील कोणी येणार नाही.  असा आदेश येथील ग्रामपंचायतीने काढला आहे  
तसेच या कालावधीत कोणीही घराबाहेर देखील पडणार नसल्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही याचे उल्लंघन केल्यास त्यास रुपये २५००० दंड आकारण्यात येणार आहे. मात्र या कालावधीत कोणाला काही गरज भासल्यास 
त्यांनी सरपंच व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या