Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




संपूर्ण देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

दि . 01/05/2020

संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढवला आहे. 
लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. काही ्प्रमाणात नियम शिथिल करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली. रेड झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. 


ताज्या बातम्या