Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादेच्या बातमीचा सकारात्मक परिणाम , मालेगावी खासगी दवाखाने उघडले; नॉन कोरोना रुग्णासाठी मोठा दिलासा. फोनवरून आधीच वेळ घेऊन, घेता येणार उपचार.

दि . 30/04/2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावातील जवळपास सर्वच खासगी दवाखाने बंद करून एकाप्रकारे नॉन कोरोना रुग्ण तपासणी आणि उपचार बंद केल्याने , शहरातील अनेक गंभीर आजारानं ग्रस्त रुग्णांचे हाल होत होते. एका प्रकारे बहिष्कार टाकलासारखा हा प्रकार असल्यामुळे , कसमादे अपडेटच्या अनेक वाचकांनी याविषयी अडचणी कथन केल्यानंतर या गंभीर विषयाला कसमादे च्या माध्यमातून वाचा फोडली. याचा लगेचच चांगला परिणाम दिसून आला असून, स्थानिक लोकप्रतिनिधीं तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांना प्रत्येक्ष त्याची तीव्रता व लोकांच्या अनेक तक्रारी कसमादे अपडेटने लक्षात आणून दिल्याने माजी महापौर, आमदार व स्थानिक प्रतिनिधींनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंच्या कानावार हा विषय टाकल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगाव दौऱ्यावर येताच शहरातील डॉक्टरांची तातडीने बैठक घेऊन डॉक्टरांच्या देखील आरोग्य सुविधा पुरवण्यास येणाऱ्या अडचणींना मार्ग काढून देण्यात येईल असे टोपे यांनी त्यांना अस्वस्थ केले. तरीदेखील कुणी आदेशाचे पालन करणार नसतील तर कारवाई सामोरे जावे लागेल असे विनती आवाहन वजा ठणकावून सांगितल्याने उपस्थित डॉक्टरांनी त्याचे स्वागत करीत सर्वच खाजगी दवाखाने चालू करणार असल्याचे सांगितले.

आज शहरातील जवळपास सर्वच प्रमुख डॉक्टरांनी दवाखाने उघडणाचा निर्णय घेतल्याने नॉन कोरणा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, आजपासून प्रमुख डॉक्टरांनी काही अटीशर्ती यासाठी लागू केल्या असून त्यांचे पालन करून रुग्णांनी उपचार करावा असे अवाहन करण्यात आलं आहे. तपसणीला येण्याआधी संबधीत डॉक्टर आणि दवाखान्याच्या नंबर वर संपर्क साधावा मगच यावे असे आवाहन शहरातील सर्व डॉक्टरांनी केले आहे.


ताज्या बातम्या