Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आत्ताच्या ११ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णामध्ये ; ५ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी

दि . 29/04/2020

शहराची रुग्ण संख्या १८२ वर , ८४ रुग्णांचा अहवाल प्राप्त..

मालेगाव (प्रतिनिधी) :- मालेगाव शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवशी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. आज एकूण ८४ अहवाल प्राप्त झाले असून यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२ वर गेली असून यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दि.२९ रोजी सायंकाळी ८४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांमध्ये ५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये देखील ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होत असल्याने चिंता वाढली आहे.


ताज्या बातम्या