Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नॉन कोरोना मृत्यूंना जबाबदार कोण ? खाजगी डॉक्टरांचा अप्रत्यक्ष बहिष्कार , असंवेदनशील डॉक्टरांचाविरोधात कारवाई होणार का ?

दि . 29/04/2020

राज्यातील मालेगाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. पूर्व भागातून पश्चिम भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडत आहे. महिना उलटत आला तरी कोरोना काही केल्या आटोक्यात येतांना दिसत नाहीय, त्यामुळे साहजिकच सामान्य लोकांमध्ये भीतीच वातावर आहे. मात्र सध्या लोकांमध्ये कोरोना पेक्षा जास्त भीती, इतर आजारांवर उपचार मिळत,  नसल्यामुळे वाटत आहे. यासाठी खासगी डॉक्टरांची असंवेदनशील वर्तणूक कारणीभूत ठरत आहे. गेल्या महिना भरापासून मालेगाव शहरातील खासगी डॉक्टरांनी यकाप्रकारे रुग्णसेवेवर अप्रत्येक्ष बहिष्कार टाकला आहे. माननीय मंत्री साहेबानी इतर आजारांवर रुग्णाचे उपचार व्हावेत यासाठी खासगी प्रयत्नही करून पाहिले मात्र मंत्रीसाहेबांच्या आवाहनाला डॉक्टरांनी ठेंगा दाखवल्याने, नॉन-कोरोना रुगणाचे प्रचंड हाल होत आहेत, यातील बरेच रुग्ण दगावत आहेत, याला जवाबदार कोण ? असा सवाल सामान्य जनतेत केला जाऊ लागला आहे.

आता कुठे डॉक्टर लोकं पदवी घेतांना रुग्णांची सेवा करण्याची शपत दिली जाते आणि घेतात देखील. कोट्यावधींचे पंचतारांकीत हॉस्पिटल रुग्णांची सेवा करण्याचे ढोंग करणारे कुठे बिळात घुसले की काय खाजगी डॉक्टर असा प्रश्न उपस्थित होत. गेल्या काही दिवसांमध्ये उपचाराअभावी काहींचा मृत्यू झाला तर त्यातील काही गरोधर महिलांना देखील याबाबत बळी जावे लागले. देशसेवेचा पुळका दाखवणाऱ्या कुठे गेल्यात त्या संघटना. आता खर्या अर्थाने रुग्णाच्या सेवेचे व्रत घेतल्याचे दाखऊन देण्याची गरज असतांना आता पुढे येतांना मात्र दिसत नाही. शासन देखील याबाबत त्यांना वेळोवेळी त्यांचे परवाने रद्द करण्याचे सांगत असले तरी शासनाच्या आदेशाला जुमानातांना मात्र खाजगी आरोग्य यंत्रणा मात्र दिसत नाही. यावरूनच शासनही याबाबत किती गंभीर आहे यावरून दिसून येते. खाजगी खाजगी डॉक्टर हे आपल्यापर्यंत आपल्या स्वतः आपण किती चांगले याचे बोंब मारत असले तरी आता सेवा करण्याची अत्यंत गरज असतांना ते घरात घुसून बसले याच्या इतकी निंदनीय बाब नाही. मात्र सलाम त्या शासकीय आरोग्य यंत्रणेला, त्या डॉक्टरांना ,त्या कर्मचाऱ्यांना जे अश्या परिस्थितीत आपले घरदार सोडून देश सेवा करताय..!


ताज्या बातम्या