Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कुसुंबारोड वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉ. यांना कोरोनाची लागण....

दि . 29/04/2020

मालेगांवी कोरोना च्या झालेल्या प्रकोपात गेल्या २० वर्षापासून रुग्णसेवा करणारे डॉ. यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे त्यांनी स्थानिक वृत्त माध्यमांना कळविले आहे.कुसुंबारोड हा मालेगांव शहरा तील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून प्रशासनाने या भागाकडे तातडीने लक्ष देवून तेथील नागरीकांची घरोघर जाऊन तप सणी करावी, अन्यथा परिस्थीती नियंत्रणाबाहेर जाईल अशी भीती डॉ.भेलसेकर दाम्पत्याने सोशल मीडियात अनेकांद्वारे केली गेली आहे.

लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वतः महापालिकेच्या वैद्यकीय पथकात आपली कोरोना टेस्ट करुन घेतली होती. त्या टेस्टचा अहवाल काल आल्याने त्यांना मंन्सुरा येथील कोरोना दक्षता विभागात आयसोलेटेड करण्यात आले आहे.

त्यांच्या सोबत पती डॉ. अतुल, १ मुलगा, १ मुलगी, आणी त्यांच्या मातोश्री असे एकाच घरात राहतात. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता डॉ अतुल : भेलसेकर यांनी व्यक्त केली आहे.

डॉ भेलसेकर यांनी याबाबत घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी यांनाही आपले निवेदन सादर केले आहे. याबाबत प्रशासनाने त्वरीत पाऊले उचलून कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक सुनील गायकवाड व मदन गायकवाड यांनी जिल्हाधिकान्यांकडे केली आहे.

नागरीकांची घरोघर तपासणी करावी-डॉ.भेलसेकर....

 माझी पत्नी आज कोरोना पॉजिटिव निघाली, आम्ही दोघेही कुसुंबा रोड मालेगांव मेरे गेल्या २० वर्षांपासून दवाखाना चालवतोय गेल्या  १५ दिवसात या भागातील ४ जनरल प्रॅक्टिशनर्स कोरोना पॉजिटिव निघाले असून त्यापैकी दोघांचे मरणही ओढवलेय या चौघानी आधीच्या ८-१० दिवसांत शेकडो पेशंट्स तपासले असतील व त्यांच्यामुळे कित्येकजण संक्रमित झा लेले असतील अशा अनटेस्टेड संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आल्यानेच माझी पत्नी व कदाचित आमचा पूर्ण परिवारही संक्रमित असू शकतो वरिल सगळी परिस्थिति लक्षात घेता कुसुंबा रोड परिसरात अविलंब सरव्हे करून तपासण्या करण्यात याव्यात व इतर डॉक्टर्स आणि सामान्य नागरिकांना वाचवावे ही नम्र विनंती हा परिसर म्हणजे एक मोठा संभाव्य धोका आहे, जेवढ्या लवकर शोधून काढाल तेवढी हानी कमी करता येईल.

 


ताज्या बातम्या