Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरातील वाईन शॉपची ऑनलाईन मद्य विक्री - पवार यांची पोलिसात तक्रार......

दि . 29/04/2020

मालेगाव शहरात सोशल मिडीयावर देशी-विदेशी मद्याची विक्री सुरु असल्याची पोस्ट टाकून शहरातील एका वाईन शॉपचा पत्ता आणि भलताच मोबाईल क्रमांक देवून मद्यप्रेमींची फसवणूक होत असल्याची तक्रार येथील उदय वाईन शॉप चे मालक उदय भगवंतराव पवार यांनी छावणी पोलीसांत केली आहे.

फेसबुक वर उदय वाईन शॉपचा संगमेश्वरातील पत्ता टाकून काही अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे तक्रारदार उदय पवार यांनी छावणी पोलीसात दिलेल्या तक्रारी म्हंटले आहे. पवार यांचे संगमेश्वर, म.फुले रोड, सांडवा पुला जवळ परवाना धारक मद्यविक्रीचे अधिकृत दुकान आहे.
या दुकानाचा पत्ता देवून कुठल्यातरी अज्ञात इसमाचा मोबाईल क्रमांक टाकून ही फसवी जाहिरात केली आहे. त्या क्रमांकावर संपर्क साधून घरप पोच हवे ते मद्य मिळवा असा मजकूर फेसबुक वरील पोस्टवर दर्शविला आहे. वास्तविक लॉकडाऊन घोषीत झाला तेव्हा पासून सदर दुकान बंदच आहे. शिवाय कुठल्याही प्रकारे ऑनलाईन विक्री करण्याचा प्रश्नच नसतांना सदर पोस्ट ही कुणीतरी खोडशाळपणाने केली असून त्यामुळे मद्यग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचे पवार यांच्या तक्रारी म्हंटले असून याबाबत अधिक तपासासाठी छावणी पोलीसांनी सायबर क्राईम ब्रेचकडे सोपविण्यात आला असल्याचे छावणी पोलीसांनी तक्रारदार पवार यांना सांगितले आहे.


ताज्या बातम्या