Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरातील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळेचं नागरिकांचा जीव टांगणीला..

दि . 28/04/2020

पोलीस प्रशासनाचा बेजबाबदारपणा !

ज्यांचे स्वॅप पाठवले जातात तरीही ते बाहेर फिरतातच कसे...?


शेवटी प्रशासन येवो अथवान येवो स्वतःच्याच भरवश्यावर आणि आत्मविश्वासावर कोरोनाला हरवायचे आहे.


मालेगाव :- मालेगाव शहरात दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि मृत रुग्णांची संख्या बघता शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अनेक करोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र अश्या संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्याऐवजी त्यांना सोडून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव शहरात घडला आहे. आरोग्य विभागाच्या अश्या भोंगळ कारभारामुळे अनेक नागरिकांचे जीव टांगणीला लागले आहे.

मालेगाव शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून शहरात १७१ रुग्ण पॉझिटिव्ह असून यातील १३ रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. यातील ७ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मात्र मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या बघता नेमका याचा प्रसार शहरात वाढलाच कसा? आणि यावर वेळीच प्रतिबंध घालण्यात प्रशासनाला यश का आले नाही? हा प्रश्न शहरातील प्रत्येक नागरिकांना पडला आहे. काल दि.२८ रोजी मालेगाव शहरात एकाच वेळी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील सोयगाव भागातील एक रुग्ण दगावला आहे. यामुळे मृतांची संख्या १३ वर गेली आहे. शहरातील पूर्व भागात गेल्या १५ दिवसात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. पूर्व भागात एवढे मृत्यूचे प्रमाण वाढले कसे ? नेमक्या कुठल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला ? याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे का? असो.. काल मालेगाव शहरात ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यातील ३ रुग्ण हे सोयगाव भागातील आहेत. यातील एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र यातील उर्वरित २ रुग्ण हे पोलीस कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील काल रात्री पर्यंत आरोग्य विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही. जर या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते तर त्यांना  क्वॉरंटाईन का करण्यात आले नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर हे पोलीस कर्मचारी करोना संशयित रुग्ण होते तर पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना का नाही केल्या. नागरिकांनी घरात राहून सहकार्य करण्याचे आवाहन करणारे पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले? पोलीस प्रशासनाच्या अश्या बेजबाबदार वागणुकीमुळे पॉझिटिव्ह रुग्ण असलेले पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे काय? याला जबाबदार कोण? यावरून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार व पोलीस प्रशासनाचा बेजबाबदार पणा उघड होतो.

" सोयगाव भागातील आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे पोलीस कर्मचारी आहेत. ते ज्या इमारतीत वास्तव्यास आहेत त्या इमारतीत एका न्यूज चॅनल चे पत्रकार वास्तव्यास आहे.त्यांना प्रत्येक्षात आलेला अनुभव त्यांनी कथन केला असून खुद्द सर्वांना शासनाच्या नियमांचे पालन करणारेच शहराच्या बाबतीत किती बेफिकीर आहेत हे यावरून लक्षात येते. त्यामुळेच मालेगावशहरात वाढत्या कोरोना बधितांची संख्या वाढली तर त्यात नवल नाही. कायद्याच्या नियमांचे अंमलबजावणीच करायला धजावत नसतील तर धन्य आहे.शेवटी भोंगळ कारभार करणे आणि त्या कारभाराला पाठीशी घालून खतपाणी घालणाऱ्या सर्वांनाच मालेगावकरांची चिंता नसल्याचे दिसून येते. शेवटी ज्यांना कोरोना झाला त्यांना बळ देण्यासाठी प्रयन्त करणारे हे धास्तावलेले मालेगावकर आहेत. अश्या परीस्थित नागरिक धास्ताउन गेले तरी प्रशासनाला त्याचे काहीच नवल नसावे... शेवटी धास्तावलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतःच्याच भरवश्यावर आणि आत्मविश्वासावर कोरोनाला हरवायचे ठरवले आहे.


ताज्या बातम्या