Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक जिल्ह्यात सुरू झाली कोरोना टेस्टिंग लॅब; पहिला अहवाल निगेटिव्ह

दि . 28/04/2020

नाशिक जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग लॅब चालू व्हावी यासाठी अनेक स्थरावरून प्रयत्न चालू होते. त्यासंदर्भात प्रशासनाकडून पाठपुरावा चालू होता. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ,नासिकयेथे लॅब आज चालू झाली असून त्यातील पहिला रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असून जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.  लॅबला मागील आठवड्यात ए आय आय एम एस मान्यता मिळाली होती. तद्नंतर पुन्हा नियमांमध्ये काही बदल झाले व लॅबला NABL मान्यता मिळवणे देखील अनिवार्य करण्यात आले. आज आपल्या लॅब ला NABL मान्यता देखील मिळालेली आहे.
यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,तसेच सर्व लोकप्रतिनिधि ,जिल्हाधिकारी सूरज मांढरे,सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. हे सर्व पार पडल्यानंतर आपल्याकडच्या मायक्रोबाॅयलाॅजिस्ट डॉ. निता गांगुर्डे व त्यांच्या दोन टेक्नियशियन यांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेल्या आठवड्यात पाठवण्यात आले, त्यांच्या प्रशिक्षणानंतर शनिवारी, रविवारी त्यांच्याकडून ब्लॅंक सॅंपल्सची चाचणी घेतली ती चाचणी दोन वेगवेगळ्या स्तरावर बरोबर निघाल्यानंतरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने या लॅबला मान्यता दिली असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले 
तसेच या सर्व समन्वयात त्यांना तहसीलदार अनिल दोंडे व आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अतिरिक्त प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांचे व डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. मृणाल पाटील, दातार लॅबचे डॉ. दादासाहेब अकोलकर व अपोलो हॉस्पिटल यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले आहे. या सर्व एकजुटीच्या प्रयत्नाना आज प्रत्यक्षात फळ मिळाले आहे


ताज्या बातम्या