Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ, आता मालेगावच्या पश्चिम पट्ट्यात कोरोचा धुमाकूळ, आठपेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र तर सोयगावातील एका बधीताचा मृत्यू..

दि . 28/04/2020

सोयगावातील  जयराम नगर परिसरात देखील शिरकाव...

 मालेगाव: कोरोना विषाणूचा धोका आतापर्यंत मालेगावच्या पूर्व भागातून पहावयास येत होता. आता मात्र कोरोनाने पश्चिम पट्ट्यातही धुमाकूळ घालायला सुरवात केली असून, सुरवात जाधव नगर , जोती नगर , शिवाजी नगर पासून होत आता सोयगाव , सटाणा नाका परिसर , कॅम्प आदि अशी आठ कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात वाढ झाली आहे. पोलीस कर्मचारी ते डॉक्टर दाम्पत्यासह आठ ते दहा कोरोना बाधीत रुग्ण मिळून आल्याने या भागातील जनतेत भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. सोयगावातील एका कोरोना बधीताचा सकाळी मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १८१ कोरोना बाधित रुग्ण असून पैकी एकट्या मालेगाव शहरातील १५९  रुग्ण आहेत. यातील पश्चिम पट्ट्यातील दहा ते बारा रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व भागात आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्ण मिळून येत होते. आता पश्चिम भागात देखील कोरोचाची दहशत पसरल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातील चांगली बाब  ती म्हणजे दोन दिवसात शेकडो संशयित रुग्णाणचे अहवाल निगेटिव्ह आले असून, अनेक कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. सध्या कोरोना बरोबरच वाढत्या तापमानाचाही धोका वाढला असून, मालेगाव शहरातील नागरिकांना कसमादे अपडेट आणि प्रशासनाच्या वतीने कळकळीची विनंती की घरीच थांबा सुरक्षित राहा यातच आपली व कुटुंबाची सुरक्षा आहे.

हे आहेत कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र..

मालेगावात एकूण कालच्या आकडेवारी नुसार कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र एकूण 36...

मोमीन पुरा ,कमाल पुरा , नायपुरा वार्ड ,इस्लामपुरा वार्ड , धोबी गल्ली / पवार गल्ली , आकसा कॉलनी ,गुलाब पार्क ,मदिनाबाग ,नूरबाग ,अपना सुपर मार्केट ,हजार खोली ,सिद्धार्थ वाडी ,चंदनपूरी गेट , खुशामतपुरा , बेलबाग ,मोतीपुरा , जुना आझाद नगर , दातार नगर ,मेहबी नगर ,जाधव नगर , संजय गांधी नगर , ज्योती नगर , कुंभार वाडा , सरदार नगर , हकीम नगर ,मुस्लिम पुरा ,नायपुरा ,कलेक्टर पट्टा , एकता नगर ,गुलशेर नगर ,उस्मानाबाद , मोहम्मदा बाग ,हिम्मत नगर , जाफर नगर ...

आता आजचे नव्याने रुग्ण ह्या परिसारत आढळून आल्याने हे होऊ शकता प्रतिबंधित क्षेत्र- सटाणा नाका परिसर , सोयगाव , कॅम्प येथील पंचशील नगर, कलेक्टर पट्टा येथील आहेत...


ताज्या बातम्या