Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सुरक्षा रक्षकच असुरक्षित, मालेगावी पोलिसांना कोरोनाची धास्ती ? ज्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले ते ड्युटीवर ?

दि . 28/04/2020

मालेगाव : जगभरात कोरोना या जिवघेण्या विषाणूची दहशत बघता आपल्या देशात त्याचा फैलाव रोखण्यासाठी वेळीच देशभरात लॉकडावून लागू करण्यात आलं. त्यानंतर राज्यातील मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून लागल्यानं साहजिकच प्रशासनावर कमालीचा तणाव येणार होता आणि तशीच काहीशी परिस्थिती मालेगावकरांच्या वर्तवणूकीवरून समोर आले. यात सर्वाधिक ताण पोलिसांवर आला रात्रंदिवस २४  तास शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाही कोरोना विषाणूची भीती वाटण साहजिकच आहे. गेली महिनाभर शहराचा पहारा करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांचे कोरोना संशयित म्हणून स्वेब घेण्यात आल्याची खात्रीशीर बातमी समोर आली असून, यातील एक कर्मचारी दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताला खुद्द जिल्हा ग्रामीण प्रमुख डॉ.आरती शिह यांनी दुजोरा दिला आहे. बाकीचे कर्मचाऱ्यांचे स्वेब २२ ते २३  एप्रिल रोजी पासून घेण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अहवाल अद्यापही समोर आला नसल्याने ते पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटूंब प्रचंड दहशती खाली असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकच असुरक्षित असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे मालेगावकरांच्या काळजी वाढणार हे मात्र निश्चित ! वरिष्ठ अधिकारीही याला अपवाद नसला तरी अधिकारी वर्गाला ज्या सुविधा प्राप्त आहेत तश्या सुविधा अथवा विश्रांती सामान्य पोलीस कर्मचाऱयांना मिळते काय हा खरा चिंतेचा विषय आहे.
कोरोनाच्या लढ्यात राज्यात दोन पोलिसांनी बलिदान दिल्यानंतरही पोलिसांच्या आरोग्याबाबत गृह खाते कधी गंभीर होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालेगावसारख्या ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या अनेक नागरिकांना धडा शिकवण्याच्या धांधलीत पोलिसांचे स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाची लागण होण्याची भीती काही डॉक्टरांनी वर्तवली होती. मालेगाव शहरात पोलिसांबरोबरच महिला पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत.
शहरातील एका पोलीस ठाण्यातील एका पोलीस दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आलेली दिसून आलेली नाही.ज्या पोलीस ठाण्यात ते काम करीत होते त्यांच्या संपर्कातील काहींचे अद्यापही कोरोनाच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या व कुटुंबीय भीतीच्या वातावरणात जगत असल्याची माहिती कसमादे अपडेट या वृत्त संस्थेला अनेक पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले नाव न सांगता माहिती दिली. मात्र याबबत अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता कुणाच्याही मनात भीती नाही पोलीस सैनिक मोठ्या हिमतीने ड्युटी बजावत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून आपली बेफिकरी दाखवली आहे.
सध्यस्थिती मालेगाव पोलिसांना अनेक प्राधान्य सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले जात आहे.सुरक्षा कीट, फेस मास्क, हात मोजे , विशेष मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या