Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
coronaworrier सलाम त्या कर्तव्याला, आरोग्याच्या समस्येशी झुंज देत आपल्यासाठीच बजावताय कर्तव्य..

दि . 27/04/2020

संकटाच्या काळात देखील पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी आपले आजारपण, आरोग्यविषयक, कौटुंबिक समस्या बाजूला..

मालेगाव - शहरात करोनाने शंभरी गाठली असून या भीषण संकटाच्या काळात देखील पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी आपले आजारपण, आरोग्यविषयक, कौटुंबिक समस्या बाजूला ठेऊन आपले कर्तव्य बजावण्यात व्यस्त आहेत. शहरातील कॅम्प पोलीस ठाण्यात जमादार असलेले राजेंद्र लक्ष्मण सोनवणे हे अशाच कर्तव्यदक्ष कर्मचा-यांचे प्रातिनिधिक उदारहण म्हणता येतील. गेल्या ४ वर्षापासून ते डायलिसीसवर आहेत. आठवड्यातून दोन वेळा यासाठी दवाखान्यात जावे लागत असतांना ते सध्या कॅम्प परिसरात रवाळगाव नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. “ करोनाचे संकट भीषण असले तरी त्यास परतवून लावू “ असा विश्वास ते व्यक्त करतात त्याचवेळी “ अधिका-यांचे पाठबळ व जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत हीच आमची प्रेरणा “ असल्याचे ते सांगतात.

शहरात करोनाने कहर केला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशा परिस्थिती करोनाला अटकाव करण्यासाठी शहरात कठोरपणे संचारबंदीची अमलबजावणी पोलीस यंत्रणेस करावी लागते आहे. करोनामुळे सर्वत्र व्यवहार ठप्प असून यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती पोलीस अधिकारी,कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरातील कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील रावळगाव नाका परिसरात राजेंद्र सोनवणे हे सध्या ड्युटी बजावत आहेत. गेल्या ३३ वर्षापासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. ४ वर्षापूर्वी मूतखड्याचा त्रास एक किडनी खराब जाणवला. औषधउपोचार घेतांना एक किडनी खराब झाल्याने ती काढून टाकावी लागली. तर दुसरी किडनी केवळ ३५ टक्के कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करावे लागते आहे. गेल्या चार वर्षापासून ते या आरोग्याच्या समस्येशी झुंज देत कर्तव्य बजावत आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ड्युटी बजावत असतांना काय आव्हाने आहेत याविषयी सांगताना सोनवणे म्हणाले, “ आजवर अनेक विपरीत परिस्थितीत काम केले आहे. परंतु करोनाचे संकट गंभीर आहे. या संकटाला हरवायचे असेल तर लोकांनी घरात थांबणे हाच एक पर्याय आहे. त्यामुळे लोकांचे प्राण वाचावेत यासाठी आम्हाला रस्त्यावर उभे रहावेच लागेल. जनतेच्या सेवेचे व्रत घेतले आहे. जनसेवा हे देखील एक पुण्यच आहे “ असे ते सांगतात. पुढे सोनवणे मात्र खंत वक्त करतात, “ लोकांना समजावून देखील जेव्हा ते रस्त्यावर येतात तेव्हा मात्र काळजी वाटते आणि कायद्याचा बडगा उगारावाच लागतो.”  सध्या कामाचा ताण असला तरी स्वतःचे आरोग्य सांभाळून कर्तव्य बजावत असून मी केवळ प्रातिनिधिक उदारहण असल्याचे सोनवणे नम्रपणे सांगतात. त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी हे देखील या संकटाच्या काळात त्यांना धीर देत असून त्यांच्यामुळे मी उभा असल्याचे ते म्हणाले.


ताज्या बातम्या