Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
३ मे नंतर लॉकडाउनचं काय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

दि . 27/04/2020

महाराष्ट्र सध्या करोनाच्या संकटाशी तोंड देत आहे. देशातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. तसेच राज्याच्या काही भागातही करोनामुळे परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाला असला, राज्याचं अर्थचक्र ठप्प झालं आहे. त्यामुळे ३ मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. याच मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दि. (२६) दुपारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्य पोलीस दलातील करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांविषयीही मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. “सध्या करोनाविरोधातील या लढ्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह पोलीस दल तणावाखाली काम करत आहे. स्वतःच्या घराचा, आयुष्याचा विचार न करता ही माणसं रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. त्यातच मुंबईत दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं त्यांना आंदराजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकार जे जे शक्य असेल ते करेल. पण, माणूस गेला आहे,” अशी खंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.


ताज्या बातम्या