Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावकरांसाठी आनंदाची बातमी , तीन रुग्ण झाले बरे..

दि . 26/04/2020

चांदवड ,मदिना बाग ,खुशामत पुरा येथील कोरोना बाधित रुग्ण होते जे बरे झालेत.

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी मालेगाव करांच्या चिंतेत भर पडत असली तरी , आता तीन कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने दिलासा मिळाला आहे.कोरोनाची लागण झालेले तीन बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मालेगावची कोरोनाबधितांची संख्या १२६ च्या घरात पोहचली आहे.तिघेही रुग्ण बरे होऊन घरी जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
 यातील तीन पैकी चांदवड येथील एक मालेगाव शहरातील दोघा महिलांचा समावेश आहे.
यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख,डॉक्टर पंकज आशिया ,नितीन कापडणीस  ,आरोग्य अधिकारी यांच्यासह प्रशासकीय व मनपा यांच्या उपस्थितीत त्यांना घरी पाठवण्यात आले असून डॉक्टरांच्या अहोरात्र मेहनतीला यश मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.


ताज्या बातम्या