Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात दोन धर्मगुरुंसह ५ जणांचा मृत्यू  १ बाधित तर अन्य ४ संशयित ; मृतात वृद्ध  डॉक्टरचा समावेश..  

दि . 25/04/2020

मालेगाव (प्रतिनिधी) : मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील बाधित रुग्णांची संख्या १२६ वर जाऊन पोहचली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार शहरात गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू 
झाला आहे.

शहरात गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका करोना बाधित वृद्ध 
डॉक्टरचा समावेश असून अन्य ४ रुग्ण संशयित आहेत. विशेष म्हणजे या संशयित रुग्णांमध्ये दोन मुस्लिम धर्मगुरूं व दोन महिलांचा समावेश आहे. 
या चारही संशयित रुग्णांचे घश्याचे श्रावं 
तपासणीसाठी पाठविले असून त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.


ताज्या बातम्या