Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कोरोनाचा हॉटस्पॉट दबावाखाली ?

दि . 23/04/2020

अल्लामा एक्बाल पुलावरचा प्रकार कॅमेरात कैद झाला, सोशल मीडियावर व्हायरल झाला,विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्तही प्रसारित केलं..याविषयी वाचा कसमादे अपडेटच्या संपादकीय...

मालेगावी गुरुवारी सकाळी अल्लामा एक्बाल पुलावर लॉकडावूचे उल्लंघन करून  जमावाने पोलिसांवर हल्ला केला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. विविध वृत्तवाहिन्यांनी देखील तो दाखवाल. मात्र जमावाने पोलिसांवर हल्ला केला नसल्याचं  पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ व  वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातम्यांमधून जे दिसले ते खरे की पोलीस अधिकारी म्हणतात ते खरे? असे प्रश्न उपस्थित होत असून लोकांनी या सगळ्याचा काय अर्थ काढला असेल याचा विचार होणे गरजेचे असून पोलीस प्रशासन दबावात काम करतोय हे यावरून स्पष्ट झालं आहे.

मालेगाव शहर कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. तरी देखील मालेगावकर जनता बेशिस्त आणि उर्मट वागणूक सोडायला तयार नाही. आरोग्य यंत्रणासह, जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची कोरोनावर मात करण्यासाठी झोप उडाली असतांना जनता मात्र, उर्मटतेचा आपलाच रेकोर्ड तोडण्याचे प्रयत्न करतांना दिसत आहे.आज सकाळी अल्लमा पुलावर लॉकडावून असूनही शेकडोंच्या संख्येने जमाव जमा होऊन थेट पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्नात असल्याचं वृत्त प्रसारित चित्र फितीवरून दिसत आहे. तश्या प्रकारचे वार्तांकन दुरचित्रवाहिन्यावर प्रसारित देखील झाले आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने जमावाणे पोलिसांवर हल्ला केला नसल्याचं जाहीर केलं आहे. अस असलं तरी बातम्या प्रसारित झाल्यामुळे सगळीकडे शेवटी जो संदेश जायला नको तो गेला हे नाकारता येणार नाही. पोलीस कितीही नाकारत असले तरी पोलिसांवर किती दबाव आहे हे या घटनेवरून दिसून येत आहे. सोशल माध्यमातून पोलिसांवर झालेला हल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे .त्यामुळे पोलिसांना एकप्रकारे मानसिक आधार मिळाला आहे. सामान्य मालेगावकर पोलिसांच्या पाठीशी असून पोलिसांचे मनोधैर्य आशा घटनानंतर देखील खचू नये अशीच अपेक्षा व्यक्त होते आहे. आजची घटना निंदनीय असून यातून साकारत पोलीस पुन्हा अहोरात्र मालेगावकारांच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहतील यात शंका नाही.


ताज्या बातम्या