Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
UPDATE-मालेगावी लॉकडावून तोडून जमला जमाव,पोलिसांवरही हल्याचा प्रयत्न आज सकाळी नऊ वाजताची घटना...

दि . 23/04/2020

मालेगावी काटे हनुमान मंदिर जवळील अल्लमाइकबाल पुलावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेकडो, समाज कंटक चक्क लॉकडावूनच उल्लंघन करीत जमा होऊन,त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला,वेळीच अतिरिक्त पोलीस बळ पोहचल्यानं मोठा अनर्थ टळला.

मालेगावी आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकड्यान शंभरी गाठली असून,जवळपास 18 ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत ,शहराच्या पूर्व भागातुन  कोरणाची सुरवात होऊन आता पश्चिम पट्ट्यातही शिरकाव केला आहे.त्यामुळे प्रशासनावर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच बेशिस्त मालेगावकर विशेषतः पूर्व भागातील काही अति उत्साही मंडळी लाकडावून काळात मोकाट फिरताना आढळून येत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे .

एव्हढयावर न थांबता आता थेट पोलिसांवर आता हल्ला होऊ लागला आहे,आज सकाळी चक्क लाकडावूनच उल्लंघन करीत,शेकडो समाजकंठक काटे हनुमान मंदिर जवळील अल्लमाइकबाल पुलावर जमा झाले,यावेळी पुलावर पोलिसांच कमी संख्या बळ पाहून,हल्ला करीत पश्चिम पट्ट्यात प्रवेश करून कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला,मात्र सुदैवानं पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहचल्याण मोठा अनर्थ टळला असून याभागातील राहिवासह्यांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे,परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी होऊ लागली आहे.


ताज्या बातम्या