Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मनपाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गोविंद पी.चौधरी यांची नियुक्ती

दि . 22/04/2020

मालेगाव - येथील महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.सायका अन्सारी  यांच्याकडून गेल्याच महिन्यात कार्यभार काढून त्यांच्या जागी  डॉ. सपना  ठाकरे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसात शहरात करोनाने थैमान घातले असून वरीष्ठ पातळीवर शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात येत आहेत. आता मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे यांच्या नियुक्तीला एक महिना होत नाही तोच यांच्याकडून कार्यभार काढून घेत पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून पूर्णवेळ डॉ.गोविंद पी.चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

येथील महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. शहरातील करोनाग्रस्थ रुग्णांची संख्या शंभरीच्या जवळपास पोहचल्याने शहरासाठी मोठी चिंता वाढली आहे. मनपाचे  आरोग्य विभागाचे अज्ञान दिसून आल्याचे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्याने  महापालिका हद्दीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 तसेच सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ सपना ठाकरे यांना सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या