Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्ह्यातील आजपर्यंत ६७६  संशयीतांची चाचणी कोरोना निगेटिव्ह; ९९ पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त व मृतांची संख्या ०८..

दि . 21/04/2020

आज सायंकाळी ६ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत कोरोना संसर्गाबातचा अहवाल  एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये घोषित करण्यात आली आहे; या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोना संसर्गितांची  संख्या ९९ असून त्यातील मालेगाव शहरातील ८५ असून त्यातील ८ जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच नाशिक शहरात १० रूग्ण बाधित असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या ठिकाणाहुन बाधित झालेल्यांची संख्या ०४ आहे. आजपर्यंत दोन कोरोना बाधित रूग्ण बरे झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

श्री. मांढरे म्हणाले, आजपर्यंत ९५१ संशयीतांचे ९५१ घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यातील ६७६ लोकांचे अहवाल
हे निगेटिव्ह आले असून ९९ लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मालेगाव महानगर पालिका क्षेत्रातील २३६ संशयीतांच्या २३६ इतक्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १४४ लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर ८४  लोकांचे अहवाल हे पाझिटिव्ह आले होते. आजपर्यंत मालेगाव मध्ये ८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यु झाला आहे.

नाशिक शहरातील ३१४ लोकांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील २८७ नमुने निगेटिव्ह आले असून त्यातील १० इतके पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या ४  लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

(सदरची आकडेवारी ही सायंकाळी ६:०० वाजता प्राप्त जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक यांच्या अहवालानुसार आहे.)
                                        


ताज्या बातम्या