Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने; शेतकरी,सुरक्षित तटबंदी करीत मालेगावी भाजीपाला लिलाव सुरू..

दि . 19/04/2020

बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव यांच्या पुढाकाराने राजीव गांधी इंटर नॅशनल या संस्थेचे पटांगण कमलाकर पवार यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समाधान..

बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव यांच्या पुढाकारने भाजीपाला लिलाव सुरु.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील भाजीपाला ठप्प झाला होता. यामुळे शहरात अस्वस्थता निर्माण झाली होती. शासकीय यंत्रणा हतबल झालेली असताना बारा बलुतेदार या सामजिक संस्थेचे सास्थांपक बंडूकाका बच्छाव व कमलाकर पवार , बाजार समितीचे संचालक सुनील देवरे , भाजीपाला असो.अध्यक्ष बाप्पू सोनवणे ,बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी कोरोना व उत्पादक यात सुरक्षित तटबंदीचा पर्याय दिल्याने भाजीपाला सुरळीत झाला आहे.


असुरक्षित गर्दीमुळे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला लिलाव बंद केले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. परिणामी शहरात भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली होती. ही समस्या प्रांत विजयानंद शर्मा यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना सांगितल्याने त्यांनी बाजार समितीचे माजी सभापती बारा बलुतेदार या सामजिक संस्थेचे सास्थांपक बंडूकाका बच्छाव यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पवार यांनी राजीव गांधी इंटर नॅशनल या संस्थेचे पटांगण कमलाकर पवार यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.  


ताज्या बातम्या