Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक...!मालेगाव शहरात आढळले आणखी १० नवीन रुग्ण, मालेगाव शहराची रुग्ण संख्या ७७

दि . 18/04/2020

मालेगाव (प्रतिनिधी) : मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले होते. यात आताच प्राप्त अहवालानुसार आणखी १० नवीन रुग्णांची वाढ झाली असून शहरातील रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आताच मिळालेल्या आकडेवारीनुसार मालेगाव शहरात आज १० रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात १० रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. शहरात रुग्णाची संख्या ७७ झाली असून यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज २ करोना संशयित रुग्णाचा देखील मृत्यू झाल्याने मालेगाव शहराची चिंता वाढली आहे.

 


ताज्या बातम्या