Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात सेनिटायझर स्प्रे यंत्र लोकार्पण सोहळा संपन्न

दि . 17/04/2020


कोरोनाचा प्रभाव हा शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही वाढु लागला आहे, मालेगावातील कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे,कोरोनाचा प्रसार देवळा तालुक्यात होऊ नये म्हणून   बाजार समिती, पोलीस स्टेशन,तसेच देवळ्यातिल अनेक महत्त्वाच्या ठिकाणी या आधीच सेनीटायझर स्प्रे यंत्र बसवण्यात आले आहे, त्याचप्रकारे आज देवळा  येथील शासकीय रुग्णालयात कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव  रोखण्यासाठी मा.ना.राज्य मंत्री बच्चु भाऊ कडुप्रेरीत सप्तशृंगी बहुउद्देशिय सामाजिक संस्था प्रहार जनशक्ती पक्ष व संघर्ष युवामंच देवळा यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय रुग्णालयात सेनिटायझर स्प्रे  यंत्राची किट बसविण्यात आली.याचे उद्घाटन प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे, बि डी ओ देशमुख, प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ पुरकर, नानाजी पर्वत आहेर,  युवा नगरसेवक उमेश आहेर, देवळा जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, प्रहारचे तालुका अध्यक्ष स़ंजय दहिवडकर, विनोद आहेर बापुसाहेब देवरे, कांदा उत्पादक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदिप भदाणे, देवळा शहराध्यक्ष हितेंद्र आहेर.   मेशी येथिल माजी सरपंच बापूसाहेब जाधव,डॉ. कृष्णा आहिरे आदी उपस्थित होते


ताज्या बातम्या