Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
छोट्या वाहनात प्रवास करणाऱ्या १५ जणांविरुद्ध येवल्यात गुन्हा दाखल

दि . 16/04/2020


येवला - विंचूर येथील किसानवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात काम करून सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास येवल्याकडे छोटा हत्तीतून परतणाऱ्या १५ जणांना मुखेड फाट्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पकडून त्यांच्याविरोधात तालुका
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची राज्य महामार्गांवर
गस्त सुरू असताना मुखेड फाट्यावरील थोरात
पैठणीजवळ सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास छोटा हत्ती (क्रमांक- एम एच४१ए यू १६२१) पोलिसांच्या गस्तीच्या वाहनाला ओव्हरटेक करून गेली.यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना वाहनांच्या दिव्यांच्या
उजेडात छोटा हत्तीत मागील भागात दाटीवाटीने बसलेले
लोक दिसून आले.पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग
करून वाहनाला अडवले असता या वाहनात १५ जण
बसलेले आढळून आले.सर्वानी तोंडाला मास्क लावलेले दिसून आले नाही.पोलिसांनी सर्वांना वाहनातून उतरवून त्यांचे हात सॅनिटायझरने देऊन धुवायला सांगितले.यानंतर सर्वांना तोंडाला लावायला मास्क सुद्धा पोलिसांनी दिले.
तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक नईम युनूस शेख(३०) रा.आभूष शहा कॉलनी,
येवला,सुफियान सय्यद 
मुश्ताक (१९)रा.कचेरी रोड,येवला,आसिफ
युसूफ खान (२६), सय्यद रईस सय्यद फकरुद्दीन (३४)
रा.मोमीनपुरा,वसीम परवेझ शेख (३०),रा.परदेशपुरा
येवला,रियाज शेख शिराझुद्दीन (३०),रा कचेरी रोड,झिया उल हक अब्दुल कादिर (३०),कचेरी रोड, इम्रानखान फरीदखान (३०),रा.परदेशपुरा ,मोईन शहा इस्माईल (२६),रा.कचेरी रोड,स्लिम गफूर शेख(३५),झुबेर शेख इकबाल(३५),एज्जज शेख महम्मद तहीर(३०),रा.गरीब नवाज कॉलनी , एज्जज खान हसिफखान (३८)परदेशपुरा, जमिळ शेख बाबू(४१),रा.परदेशपुरा,सोहेल खान रैफखान(२६)रा.परदेशपुरा,याच्या विरुद्ध जमावबंदी मनाई आदेशाचा भंग सीआरपीसी १४४(२)तसेकं भदवी कलम २६९,२७०, २७१,व १८८ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हे सर्वजण विंचूर  येथील किसनवाडीतील राधाकृष्ण जेऊघाले याच्या द्राक्ष शेतात कामास गेल्याचे त्यांनी पोलीसास संगीतले.


ताज्या बातम्या