Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सौंदाण्यात स्तुत्य उपक्रम ; प्रत्येक कुटुंबाला मोफत घरपोच भाजीपाला, मास्क व सॅनिटायझर..

दि . 15/04/2020

मालेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊन नये लॉक बंदीचे काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी यासाठी ग्रामीण भागात देखील काटेकोरपणे नियोजन केले जात असल्याचे दिसून यते. पण आठवडे बाजार बंद झाल्याने झाल्याने ग्रामीण भागातही भाजीपाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे आठवडे बाजारदेखील बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेता मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सौंदाणे, विविध कार्यकारी सोसायटी व स्थानिक शेतकरी यांनी पुढाकार घेत लॉकडाउनचे उल्लंघन करण्याची वेळ कुणावरही येऊ नये व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सौंदाणे गावातील सर्व १५०० पेक्षा जास्त कुटुंबांना या उपक्रमातून घरपोच एका आठवड्याचा भाजीपाला ,मास्क व सॅनिटायझर चे वाटप सुरु केले असून जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत याचा लाभ मिळेल असे सरपंच मिलिंद पवार ,भरत पवार व स्थानिक शेतकऱ्यांनी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


ताज्या बातम्या