Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहरातील पूर्ण संचारबंदी ३० एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन ; बँका देखील पुढील पाच दिवस बंद..

दि . 15/04/2020

शहरातील पूर्ण संचारबंदी वाढली. दि 15 ते 30 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन कायम राहणार. भाजी विक्रेते व किराणा दुकानदारासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत वेळ. मेडिकल, हॉस्पिटल व दुध विक्रेते, गॅस एजन्सीला वगळे. तर शहरातील बँक दि 15 ते 19 एप्रिल दरम्यान बंद राहणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिले आहे.

काल च्या आलेल्या रिपोर्टनुसार नवीन पाच जण पोसिटीव्ह मिळून आले असून त्यात दोन डॉक्टरांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जाते.
आत्तापर्यंत मालेगावात 36 जन बाधित झाले असून त्यात 2दोघांचा मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाच्या रुग्णांची  वाढती संख्या पाहता , शहरात आता पुढील 30 तारखेपर्यंत कर्फ्यु वाढवण्यात आला असून त्याबाबत कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले आहे. लोकांनो घरीच बसा बाहेर फिरतांना सापडल्यास वाहन जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून आता शहरात CRPF जवानांच्या तुकड्या देखील दाखल झाल्या असून , लोकांनी घरात राहून सहकार्य करावे अशी माहिती प्राधिकरण अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली आहे.


ताज्या बातम्या