Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ; नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये : डॉ.पंकज आशिया..

दि . 14/04/2020

मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1)(3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली असतांनाही शहरातील मध्यवर्ती भागात काही नागरिकांचा अजुनही संचार दिसून येत आहे. अशा नागरिकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी विनाकारण घराबाहे पडू नये असे आवाहन घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेश सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल झाल्या आहेत. तसेच जळगाव येथून 100 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आली आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट तयार होऊ नये यासाठी शासनाने विशेष दखल घेत मोठा फौजफाटा मालेगाव शहरात पाठविला असून दंडात्मक कारवाई टाळण्यासह आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे कळविले आहे. 
 
जमावबंदीच्या अनुषंगाने कालपर्यंत 187 गुन्ह्यांची नोंद झाली असून आज 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कालपर्यंत 254 वाहनांकडून 47 हजार तर आज 58 वाहनांकडून 11 हजार असा एकूण 58 हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.

आज मालेगाव शहरात 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून यांना यापुर्वीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन डॉ.आशीया यांनी केले आहे.


ताज्या बातम्या