Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादेच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ,चणकापुर,पुनदमधुन ऊद्या सुटणार कसमादेसाठी पाणी..

दि . 14/04/2020

प्रतिनिधी राकेश आहेर: चणकापूर धरणात पाणीसाठा शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देत चणकापुर प्रकल्पातील गिरणा व पुनद नदीला पाण्याचे आवर्तन सोडुन कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी कळवन चे आमदार नितिन पवार, चांदवड देवळ्याचे आमदार ऱाहुल आहेर, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांच्याकडे केली होती. याबाबत नाशिक मालेगाव पाटबंधारे विभागाने १५ एप्रिल ला पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कसमादे पट्ट्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
      गिरणा व पुनद नदीचे पात्र कोरडेठाक झाल्यामुळे या नद्यांमधील पाण्यावर अवलंबून असलेल्या कसमादे परिसरातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत कोरोनामुळे शहरी भागात असणारे लोक गावाकडे वळले आहेत त्यामुळे पाण्याची गरज जास्त वाढली आहे. चणकापूर उजव्या कालव्यावर आधारित गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून या कालव्यातून रामेश्वर धरणात पाणी सोडले जाणार आहे यामुळे देवळा व परिसरातील गुरांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
  चणकापूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चणकापूर उजव्या कालव्यातून २०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन तसेच गिरणा नदीकाठालगत असणाऱे गिरणा आईचे जणू दोन लेकरचं गिरणा डावा व गिरणा उजवा कालव्यांना ७५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. अशी माहिती कळवन चे आमदार नितीन पवार व देवळ्याचे आमदार राहुल आहेर यांनी दिली.


ताज्या बातम्या