Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार मालेगावात पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह..

दि . 13/04/2020

प्रतिनिधी मालेगाव शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाला आहे. त्यामुळे मालेगाव येथील रुग्णसंख्या ३० वर पोहोचली आहे. आज मालेगावचे आठ अहवाल मिळाले. यामध्ये सात अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा व्यक्ती पूर्वीच्या पॉझिटीव्ह कुटुंबातील निकटवर्तीय सदस्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मालेगावमधील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या  ३० वर पोहोचली आहे. यामध्ये दोघा मृतांचा समावेश आहे.


ताज्या बातम्या