Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात कोरोनाची झपाट्याने लक्षात घेता घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून IAS डॉ.पंकज आशिया यांची नियुक्ती

दि . 12/04/2020

मालेगावात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मालेगावात कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. आज कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मालेगावात एकूण 29 रुग्ण आढळले असून त्यातील 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची साखळी वाढू नये म्हणून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांचं लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. मात्र मालेगावात प्रशासकीय यंत्रणा अजूनदेखील गंभीर नसल्याचे वाढत्या रुग्णावरून दिसून येते.

मालेगाव हे आता उत्तर महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे हॉट झोन बनले आहे.

मालेगावात कोरोनाची झपाट्याने लक्षात घेता घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून IAS  अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची नियुक्ती ..


ताज्या बातम्या