Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी हानी टळली...

दि . 12/04/2020

मालेगावी   दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी 2  वाजेच्या सुमारास दाभाडी साखर कारखान्यातील गवताला व झाडाझुडपांना पुर्व बाजुने आग लागली असता मालेगाव अग्निशमन दलाने सदर आग वेळेवर पोहचुन मोठे नुकसान टळले.आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.
सविस्तर वृत असे की आज रोजी दुपारी 2 वाजता दाभाडी साखर कारखाना येथील मोकळ्या जागेत अचानक आग लागली व आगीने पुर्व पश्चिम व दक्षिण अशा तिनी बाजुने उग्र रुप धारण केले मालेगावचे मुख्य अग्निशमन अधिकारी  संजय पवार यांच्या मार्गदर्शना खाली तात्काळ तिन अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. आगिवर नियंत्रण मिळवले व बाजुलाच कारखान्यात असेलेले कापुसचे गोडावुन व माॅलेसेस केमिकलसाठा असेलेले टाकी वाचवली , त्यामुळे मोठी वित्तहानी टळली. 
ही कामगिरी मालेगावचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन तुकाराम जाधव ,सुधाकर अहिरे , श्रीकृष्णा बशिरे , संजय महाले कृष्णा कोळपे , सत्यजित अहिरे चालक जीवन महिरे , जमिल शेख , फिरोज पठाण यांनी पार पाडली


ताज्या बातम्या