Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




धक्कादायक ! मालेगावी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या ..

दि . 11/04/2020

मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षण अझहर शेख यांनी त्यांच्याकडील सर्विस रिव्हाँलवरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे,एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची कोरोना बाबत बैठक सुरु असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अधिक माहिती अशी की, मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढल्यामुळे आजपासून चार दिवस मालेगाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, आज पोलिसांची रणनीती काय असेल याबाबतची महत्वाची बैठक शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु होती.याच वेळी सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या अझहर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाच्या परिसरात एका झाडाखाली स्वत:च्या सर्विस रिव्हालवरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शेख यांच्या आत्महत्येची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली. बैठक सोडून बशीर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाकडे धाव घेतली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी मालेगावी असताना हा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.


ताज्या बातम्या