Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धक्कादायक, कोरोनाच्या भीतीने नाशिकमध्ये युवकाची आत्महत्या..

दि . 11/04/2020

आपल्याला कोरोनाची लक्षणे असून उपचाराची भीती वाटत असल्याने नाशिक शहराजवळ असलेल्या चेहेडी पंपिंग परिसरातील एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून घशात त्रास होत असल्याच्या कारणास्तव त्रस्त झाल्याने मी आत्महत्या करत आहे, मला करोनाची लक्षणे असून मला उपचारांची भीती वाटत असल्याने मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले होते. प्रतिक राजू कुमावत (31, रा. श्रीकृष्ण काॅलनी, चेहेडी) असे मृताचे नाव आहे.
करोनाने जगाला हादरून सोडले आहे सर्व माध्यमांवर विशेषता सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात करोना संदर्भात सातत्याने वृत्त दाखवले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून अनेकांना या भीतीमुळेच मानसिक आजारही जडत असल्याची माहिती मनसोक्त तज्ञांनी दिली. या माहितीची प्रचिती शनिवारी आत्महत्येच्या प्रकरणावरून आली.
दरम्यान सिन्नरफाटा पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोरोना विभागाच्या वैद्यकिय पथकाला पाचारण केले. पथकाने त्याच्या घशातील नुमने घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांंनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


ताज्या बातम्या