Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्हा प्रशासन , महानगरपालिका व पोलिसांच्या असमन्वयामुळे मालेगाव कोरोना संदर्भात कम्युनिटी स्प्रेड च्या उंबरठ्यावर ?

दि . 10/04/2020

दोन दिवसात दहा किरोना रुग्ण आढळले, शहरात भययुक्त खळबळ

  • कोरोना ह्या विषाणूने संपूर्ण जगात हाःहाकार उडवून दिला, लाखों मिणसांना लागण आणि हजारोच्या मृत्यूमुळे जगात प्रचंड दहशत माजली आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारतात वेळीच पाऊल उचण्यात येऊन २३ मार्च पासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्याची अंमलाबजावणी देशात चांगल्या प्रकारे होताना दिसून आली.  मालेगावात मात्र सुरुवाती पासून जबाबदार यंत्रणांना याचे गांभीर्य वाटल्याचे दिसले नसल्याचा आरोप जनतेकडून होऊ लागला आहे.

शहरात २४ तासांच्या आत कोरोनाचे तब्बल ९ रुग्ण आढळून आल्यानंतरदेखील  मालेगावरांच्या आचरणात कवडीचाही फरक पडलेला नाही. शब्ब ए बारातनिमित्तची २१ तासांची संपूर्ण संचारबंदी मागे हटताच शहराच्या पूर्व भागात रस्ते गर्दीने फुलले. चहाटपरीपासून उघड्यावरील मांसविक्री तेजीत आली. विशेष म्हणजे, कोरोनाबाधित रुग्णांचा रहिवास परिसर सील केल्याचा प्रशासनाचा दावाही फोल ठरला आहे. या भागात सर्व काही आलबेल चित्र आहे.

‘बहुसंख्य’ मालेगावकरांची ही बेफिकीरी शहराला उत्तर महाराष्ट्राचे हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी पुरक ठरु पाहत आहे.

प्रशासनाची ही हतबलता नियम व लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणार्‍या सूज्ञ नागरिकांशी केलेली कुचेष्टाच म्हणावी लागेल.

शहरातील पूर्व भागात तर कोरोना हा विषय हसण्यावारी घेत लोकं बंद काळात मोकाट रस्त्यावर फिरतांना दिसून आलेत आणि आजही ते दिसून येत आहेत. ह्या अश्या बेफिकीरीला जसे लोक जवाबदार आहेत तसेच मालेगाव महापालिका आरोग्य विभाग, आयुक्त आणि जिल्हा महसूल, पोलीस प्रशासनही तितकेच जवाबदार आहे. कायदा आणि सुव्यवस्था खराब होईल असल्या भंकप धमक्यांना प्रशासन नेहमी बळी पडत आले आहे. त्याचाच प्रत्यय कोरोनाशी लढ्यातही दिसून आला आहे. आता पर्यंत ५० हून अधिक कोरोना संशयितांची तपासणी झाल्या, १४ ,किंवा १५ तारखेनंतर लॉकडाऊन मधून दिलासा मिळेल अशी अपेक्षा वाटत असतांना, पण घात झाला.

गेल्या दोन दिवसात लागोपाठ १० रुग्ण पॉझीटीव्ह आल्याने मालेगावकर जनतेत प्रचंड दहशत पसरली आहे. दिल्ली मरकजहून काही तबलीक जमाती परत मालेगाव दाखल झाल्याची चर्चा होत होती. मात्र, किती जण पुढे आले किंवा किती जणांचा शोध लागला याविषयी प्रशासन मूग गिळून आहेत.उलट लोक प्रतिनिधींचे डॉक्टरांना धमकावणे,आपला पावरलुम कारखाना चालू ठेवणे, कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करणे असे 'नेक दिली' काम वरिष्ठांनी करणे,यामुळेच मालेगाव शहराला आता कम्युनिटी स्प्रेडचा धोका प्रचंड वाढला आहे ?

कारण, शहरातील पूर्व भागातील स्थानिक डॉक्टर आजारी रुग्णांची माहिती प्रशासनात देत आहेत  की नाही याविषयी खात्रीलायक माहिती अध्याप समोर आलेली नाही.

त्यामुळेच मालेगावच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. स्व भल्यासाठी नेहमी गलिच्छ राजकारण करणारे धार्मिक नेते असोत वा राजकीय पुढारी यांनी आतातरी स्वार्थ धुंदीतुन बाहेर पडून गल्लीबोळातील आजारी लोकांची माहिती घेवून वा मिळवून प्रशासनास द्यावी, तसेच प्रशासनाने कातडी बचाव धोरणाचा त्याग करून मालेगावकारांची या मानवत्रजातीवर ओढवलेल्या संकटातून मुक्तता करावी. त्याच बरोबर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील जनतेनं कोरोनाशी लढा लढण्यासाठी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करावे लागेल तरच मालेगावच्या बचाव आहे, अन्यथा काय होईल आता तरी सांगणे कठीण असलं तरी चिंतेत भर मात्र पडलीच आहे!


ताज्या बातम्या