Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील ३ डॉक्टर व २७ नर्ससह ३५ जणांचे स्वेब नमुने पाठवले तपासणीसाठी..

दि . 09/04/2020

मालेगाव (प्रतिनिधी) :- शहरात करोना संसर्ग विषाणूचा शिरकाव झाला असून मालेगाव शहरात एक करोना बाधित रुग्ण दगावला असून ४ रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यामुळे शहरातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 
गुरुवारी शहरातील ३५ करोना संशयित रुग्णांचे स्वेब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यात सामान्य रुग्णालयातील ३ डॉक्टरसह २७ नर्सचा देखील समावेश असल्याने चिंतेत भर पडली आहे.सर्व तिसच्या तीस जनांना हॉस्पिटलमध्येच राहण्याची सोय करण्यात आली आहे.

शहरात करोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरुवारी या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे व ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी मालेगावी दौरा करीत शहरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कठोर उपाययोजना करण्यात येत असून शहरातील चार परिसर पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी असताना देखील काही उपद्रवी मूल्य याचे उल्लंघन करीत असल्याने प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. यात करोना संशयितांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. गुरुवारी एकूण ३५ करोना संशयितांचे स्वेब नमुने तपासणीसाठी पाठवले असून यात सामान्य रुग्णालयातील तिघा डॉक्टरसह २७ नर्सचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. या ३५ रुग्णांच्या अहवालांकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.


ताज्या बातम्या