Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
५ कोरोना पॉसिटीव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे; मालेगावातील उपाययोजणांचा कृषिमंत्री भुसे व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा...

दि . 09/04/2020

मालेगाव शहरात काल पाच करोना रुग्णांचा अहवाल positive आला असून यात एका रुग्ण दगावल्याने प्रशासन खडबडून जागे झाले.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्ट हाऊस येथे सर्व प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली.मालेगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांची कुठलीही विदेश दौऱ्याची हिस्ट्री नसल्याने त्यांना सदर संसर्ग कोणाकडून व कसा झाला याचा शोध घेण्याचे आवाहन प्रशासनावर आहे.
प्रशासन सुरुवातीपासून मालेगावकडे अधिक लक्ष देऊन होतो. गुरुवारी मात्र अचानक ५ संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह आलेत. यातील एक संशयित आधीच दगावले होते. त्यांची लक्षणे करोना सदृश अशीच होती. त्यामुळे करोना रुग्णाचे अत्याविधी करतांना जी खबरदारी घेतली जाते तीच खबरदारी त्या रुग्णाचे अत्याविधी करतांना घेण्यात आली. 
प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे की उर्वरित चार करोना रुग्ण कोणत्याही परदेशात जाऊन आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना करोनाची लागण कशी झाली हे शोधून काढणे आवाहन असेल. शहरात संचारबंदी लागू असतांना बऱ्याचवेळेला नागरिक अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले कदाचित त्यामुळेच त्या चौघांना करोनाची लगान झाली असेल. करोनाचे मालेगावातील संक्रमण थांबण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलतो आहोत. सध्या लागू असलेली संचारबंदी काही दिवसांसाठी वाढणार आहोत. कोम्बिंग ऑपरेशन्स सुरु केले आहे. घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यासाठी ४०० टीम्स तयार केल्या आहेत. 
सर्व नागरिकांनी आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोणाला लक्षणे आढळून आल्यास, विदेशातून आलेले असल्यास त्याविषयीची माहिती लपवू नका. प्रशासनाला सहकार्य करा. बैठकीत धान्य पुरवठा, हॉस्पिटल तयारी बद्दल तयारी केली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी सज्ज आहेत आता लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. शहरातील परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत. याचा सर्वे सुरु करीत आहोत. संशयित आढळून आल्यास त्यांना क्वारेंटाइन केले जाईल. संस्थात्मक क्वारेंटाइनच्या पुरेशा सुविधा आहेत. व्हेनटीलेटर कमतरता असली तरी खाजगी व्हेनटीलेटर ताब्यात घेत असून नवे व्हेनटीलेटर खरेदी केले जातील. 
शहरात सध्या पुरेशी पोलीस बळ असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे. तसेच बेरीकेतिंग केले जाते आहे. कारवाई केली जाईल. 
एकूण ७२ पैकी ४५ रिपोर्ट आले आहेत. यातील ४० रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ५ पॉझिटिव्ह आलेत. २७ रिपोर्ट प्रलंबित आहेत. जिथे जिथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील तो भाग पूर्णतः सील केला जाईल. शहरात ज्या भागात चार रुग्ण आढळून आले आहेत तो भाग देखील सील केला जाईल. लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातील त्यासाठी व्यवस्था केली जाईल. आज सामान्य रुग्णालयाल व जीवन रुग्णालयास भेट जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना हा रोग कसा झाला हे शोधणे मोठे आव्हान असेल. सर्वेक्षण करण्यासाठी टीम तयार केल्यात. स्वतंत्र रुग्णालयात खाटांची व्यवस्था केली आहे. व्हेंटीलेटर व्यवस्था केली आहे. परंतु करोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळल्याने करोना मालेगावकरांचा दारा पर्यंत येऊन पोचला. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यावी. येते आठ दिवस महत्वाचे आहे. गांभीर्य लक्षात घ्यावे घराबाहेर पडू नका. नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्यासाठी व्यवस्था केली जाते आहे.असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, माजी आमदार आसिफ शेख, स्थायी समिती सभापती डॉ खालिद परवेज, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राउत, आयुक्त किशोर बोर्डे, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, अपर पो अधिक्षक संदीप घुगे, पोलीस उपाधिक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, उपायुक्त नितीन कापडणीस, वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. भीमराज त्रिभुवन, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकम, आदी उपस्थित होते.
शासन करोनाचे गांभीर्य घेऊन नागरिकांना घरातच राहणायचे वारंवार आवाहन करून देखील मालेगावकर मात्र याबाबतीत काहीही गांभीर्य घेत नसल्याचे दिसून आले आहे.पाच रुग्णांनाना कोरोनाची लागण झाल्यानतर या मोकाट फिर्णार्यांमुळे शहराला देखील धोका पोहचू शकतो त्यामुळे यांचेवर मालेगाव मनापा प्रशासन गांभीर्य घेईल का आहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


ताज्या बातम्या