Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडले जाणार नाही, मोदींनीच केलं स्पष्ट

दि . 09/04/2020

नवी दिल्ली:- जगभरात कोरोना व्हायरसचा कहर बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानुसार संपुर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र देशभरात लॉकडाऊन केले असतांना देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारच्या वर गेली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता देशात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवणार किंवा नाही याच गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याबाबत अद्यापही मोदी सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत बिजु जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी लॉकडाऊन बद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी 14 एप्रिलनंतर पुर्णपणे लॉकडाऊन हटवणार नाही असे सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत पिनाकी मिश्रा यांनी पीटीआय सोबत बोलतांना असं सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलनंतर एकाच वेळी देशभरातील लॉकडाऊन हटवला जाणार नाही असं स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या आधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती सारखी नसणार असंही मोदींनी म्हंटल असल्याची माहिती त्यांनी बोलतांना दिली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन फक्त 14 एप्रिलपर्यंत राहणार की त्यानंतर या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. 


ताज्या बातम्या