Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातील कोणत्या कोणत्या परिसरात आढळले कोरोनाचे पाचही रूग्ण.. ?

दि . //

सामान्य रुग्णालय मालेगाव, जि.नाशिक येथे कोविड- १९(कोरोना) आयशोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांपैकी गुलाबपार्क, मधील ५१ वर्षीय रहिवासी यांना मालेगावातील खाजगी रुग्णालयाकडून श्वसनाचा आस असल्यामुळे दिनांक ०६/०४/२०२० रोजी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या घशातील नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून तो कोरोना बाधीत असल्याचा निष्कर्ष आला आहे. सदर रुग्णाची तब्बेत आज अचानकपणे गंभीर झाल्याने आज दिनांक ०८.०४.२०२० रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.

ह्या ठिकाणचे आहेत रुग्ण..

तसेच कमालपुरा,  ४६ वर्षीय रुग्ण, मोमीनपुरा येथील ४८ वर्षीय रुग्ण, तसेच मदनीबाग,  येथील ३८ वर्षीय महिला रुग्ण अशा एकुण ०४ रुग्णांचा यात समावेश आहे. 

तसेच जिल्हास्तरावरील साथरोग नियंत्रण कक्षातील टीम सर्वेक्षणाचे सनियंत्रण करणार आहे. या सर्वेक्षणातुन श्वसनसंस्थेच्या आजाराच्या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. व गरज असलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत.तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे धाबरून जावू नये. सर्वांनी घरातच राहावे, असे आवाहन मा.जिल्हाधिकारी श्री.सुरज मांढरे, मालेगाव महापालिकेचे आयुक्त श्री.किशोर बडे, जिल्हा परिपदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड, पोलीस आयुक्त श्रा.विश्वास नागरे पाटील, नाशिक ग्रामीण विभागाच्या पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक श्री.सुरेश जगदाळे, सामान्य रुग्णालय मालेगाव येथील वैद्यकीय अधिक्षक था.किशोर डांगे ,मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.ठाकरे यांनी केले.


ताज्या बातम्या